डोंबिवली : सात लाखांची लाच मागणारा पोलिस हवालदार जाळ्यात

लाचलुचपत विभागाकडून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
Dombivali Bribe News
सात लाखांची लाच मागणारा पोलिस हवालदार जाळ्यातFile Photo

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून नाव समाविष्ट करू नये, यासाठी पोलिसाने लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारदाराकडे सात लाखां ऐवजी पाच लाख रूपये स्वीकारण्यास पोलिस तयार झाला होता. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातील हवालदार सुचित निवृत्ती ठिकेकर (वय 40) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने बुधवारी (दि.10) गुन्हा दाखल केला आहे. ठिकेकर हे याच पोलिस ठाण्यातील क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहेत. तथापी किचकट गुन्ह्यांची उकल करण्यात माहिर असलेले ठिकेकर लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यामुळे ठाणे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.

Dombivali Bribe News
छ. संभाजीनगर : १ लाखाची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक 'ACB'च्या जाळ्यात

या संदर्भात पोलिसंकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या मित्राच्या मेहूण्या विरूध्द महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणात मेहूण्याला आरोपी करण्यात येऊ नये, यासाठी तक्रारदार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुचित ठिकेकर यांच्याकडे आग्रह केला होता. दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात मेहूण्याला आरोपी करायचे नसेल तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सात लाख रूपये लागतील, अशी मागणी हवलदार ठिकेकर यांनी तक्रारदाराकडे केली. गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. ही रक्कम कमी करण्याची मागणी तक्रारदाराने केली. तथापी ठिकेकर या व्यवहाराला राजी होत नव्हता. अखेर सात ऐवजी पाच लाख रूपये स्वीकारण्यास हवा. ठिकेकर तयार झाला.

Dombivali Bribe News
परभणी: ७ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचे उपअधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

ठिकेकर पैशांसाठी तगादा लावत असल्यामुळे हा विषय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांना कळवण्यात आले. अधीक्षक लोखंडे यांनी दिलेल्या आदेशांनुसार अप्पर पोलिस अधीक्षक गजानन राठोड, महेश तरडे, पोलिस निरीक्षक विजय कावळे आणि यांच्या पथकाने ठिकेकर आणि तक्रारदार यांच्यात फोनवर होणाऱ्या संभाषणावर नजर ठेवली होती. यामध्ये ठिकेकर फसला. तक्रारदाराकडे लाच मागत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी ठिकेकर याच्या विरोधातील यासंदर्भातील तांत्रिक पुरावे जमा केले. त्या आधारे सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विजय कावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात बुधवारी हवा. सुचित ठिकेकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी लाचविरोधी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news