Dombivali Crime News: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तिघांना अटक; दोन आरोपी अल्पवयीन

तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Girl Molestation
Girl Molestationfile photo
Published on
Updated on

डोंबिवली: डोंबिवलीजवळच्या ग्रामीण परिसरात राहणारी १६ वर्षीय मुलगी गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. या तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अत्याचार करून पसार झालेल्या चायनिज हॉटेलच्या चालकासह तिघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी दोघे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना भिवंडीतील बालसुधारगृहात पाठवले आहे.

Girl Molestation
Social Media Scam: समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या महिलेला ९० हजारांचा गंडा

सदर मुलगी ही काही दिवसांपासून बेपत्ता होती. घरात वाद झाल्याने ती एका व्यक्तीसोबत घरातून निघून गेली होती. कटाई-बदलापूर रोडला असलेल्या एका चायनिज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली असता तिच्याकडे पैसे नसल्याने हॉटेल चालकाने तिला मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतले.

त्यानंतर हॉटेल चालकाने तिची ओळख परिसरातील दोन अल्पवयीन मुलांशी करून दिली. मुलीने आपली अडचण तिघांना सांगितली असता त्यांनी तिला नोकरीसह राहण्याची सोय करून देतो असे सांगून एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर सोडून पोबारा केला.

Girl Molestation
Central Railway Mega Block: मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक; अनेक लोकल गाड्या उशिराने धावणार, काही रद्द

पीडित मुलगी कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. जागरूक रहिवाशांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले. तिने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. कुळगाव-बदलापूर पोलिसांनी या मुलीला मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news