Dombivli Stray Dog issues| कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा वाद विकोपाला! कुत्र्याला ठार मारले

प्राणी मित्रांवर खंडणी मागितल्याचा आरोप, भटक्या कुत्र्याला ठार मारल्याप्रकरणी अज्ञात इसमांच्या विरोधातही गुन्हा दाखल
Stray Dogs
Stray DogsPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणमधील हाय प्रोफाईल वाधवा मेडोज् या सोसायटीमध्ये प्राणी मित्र आणि रहिवासीयांचा वाद पोहोचला आहे. भटक्या कुत्र्यांना अन्य ठिकाणी सोडण्याकरिता प्राणी मित्रांनी रहिवाशांकडे पैसे मागितल्याचा आरोप झाल्यावर खडकपाडा पोलिसांनी दोघा प्राणी मित्रांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र याच दरम्यान एका भटक्या कुत्र्याला ठार मारल्या प्रकरणी त्याच पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे, तर दुसरीकडे प्राणी मित्र आणि रहिवाशांतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्याण पश्चिमेकडील भोईरवाडी परिसरात असलेल्या वाधवा मिडोज् गृहसंकुलातील डायमंड बिल्डींगमध्ये राहणारे महेंद्र गोविंद पुरोहित (४९) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोसायटीच्या आवारात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याला क्रूरपणे ठार मारणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास सोसायटीतील काही रहिवासी हातात दांडके घेऊन कुत्र्यांना मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यातच रात्री दहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारात काळ्या रंगाचा कुत्रा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. या घटनेनंतर ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर हिर राजपूत यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरूवातीला दोन वेळा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यावर तिसऱ्या वेळी ठाण्यातील प्राणी मित्र पल्लवी पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पहाटे ५.१७ वाजता अज्ञात इसमांच्या विरोधात महेंद्र पुरोहित यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पॉज संस्थेचे डॉ. निलेश भणगे यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news