Dombivali Crime : डोंबिवलीतील ‘स्वीट ड्रीम्स’ बारवर पुन्हा पोलिसांचा छापा; अश्लील कृत्ये करणाऱ्या १८ जणांविरोधात गुन्हा दाखल

AI द्वारे तयार केलेले छायाचित्र
AI द्वारे तयार केलेले छायाचित्र
Published on
Updated on

डोंबिवली : शहरात पुन्हा एकदा अश्लील नृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण रोडवरील पाथर्ली स्मशानभूमीजवळ असलेल्या वादग्रस्त ‘विक्रांत पॅलेस’ अर्थात ‘स्वीट ड्रीम्स’ बारवर टिळकनगर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारबाला, चालक, मालक आणि ग्राहकांसह एकूण १८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वीट ड्रीम्स बारमध्ये शासनाने दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून विनापरवाना महिला वेटर्सकडून अश्लील नृत्य करून घेतले जात होते. तोकडे कपडे परिधान करून आणि अश्लील अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय गणगे आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास या बारवर छापा टाकला.

पोलीस पथक बारमध्ये शिरले असता, तिथे वाद्यवृंदाच्या तालावर महिला वेटर्स स्टेजवर अश्लील हावभाव करत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसून आले. पोलिसांनी तात्काळ बारचे सर्व दरवाजे बंद करून परिसराचा ताबा घेतला. जेव्हा व्यवस्थापनाकडे महिला वेटर्सच्या सेवेचा परवाना आणि नोकरनाम्याची मागणी केली, तेव्हा व्यवस्थापक कोणतीही कायदेशीर कागदपत्रे सादर करू शकला नाही. या झाडाझडतीत पोलिसांनी ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीकृष्ण कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारचा चालक राजेश शेट्टी, लोकेश नाईक, व्यवस्थापक अश्विन पुजारी, वेटर्स, बारबाला, दोन ग्राहक आणि वाद्यवृंद वादक अशा १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वारंवार होणाऱ्या कारवाईचा दरारा उरला नाही?

विशेष म्हणजे, याच वादग्रस्त बारवर गेल्या वर्षी २ मे रोजी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली होती. त्यावेळी ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, इतक्या मोठ्या कारवाईनंतरही बार चालकांवर कोणताही परिणाम झाला नाही ला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news