Dombivali Crime : शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण : डॉ. वैभव साळुंखे यांची कल्याण न्यायालयात साक्ष

लाईट गेल्याने कामकाज ठप्प : उर्वरित साक्ष बुधवारी होणार
Dombivali Crime : शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण : डॉ. वैभव साळुंखे यांची कल्याण न्यायालयात साक्ष
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य आरोपींच्या प्रकरणाची मंगळवारी कल्याण न्यायालयात सुनावणी झाली. कल्याण न्यायालयात डॉ. वैभव साळुंखे यांची प्रत्यक्ष साक्ष न्यायमूर्ती एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयासमोर झाली, यावेळी न्यायालयाची लाईट दोन वेळा गेल्याने न्यायालयीन काम काही काळ ठप्प झाले होते. यामुळ डॉ. साळुंखे यांची साक्ष पुन्हा उद्या बुधवारी होणार आहे.

    शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांना झालेल्या मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य चार आरोपींवर गुन्हा दाखल असून म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली. यावेळी डॉ. साळुंखे यांची साक्ष नोंदविण्यात आली.

यावेळी डॉ. साळुंखे यांना आरोपींकडून केलेली शिवीगाळ, मारहाणीचे रेकॉर्डिंग, पंचनामा, तपासणी आदी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने हे सर्व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयातील लाईट गेल्यामुळे डॉ. साळुंखे यांची साक्ष नोंदविण्यास आणि आरोपींच्या वकिलांना उलट तपासणी करण्यास विलंब झाल्याने राहिलेली साक्ष उद्या बुधवारी होणार आहे. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी काम पाहिले, तर आरोपींच्या वतीने ॲड. विशाल भानुशाली, ॲड. गणेश पाटील, ॲड. उमर काझी आदींनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news