Dombivli Crime : डोंबिवलीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले, दांडक्याने मारहाण करत सोन्याची चेन लंपास

विष्णूनगर पोलिसांकडून दोघा लुटारूंचा शोध सुरू
Dombivli Crime : डोंबिवलीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले, दांडक्याने मारहाण करत सोन्याची चेन लंपास
Published on
Updated on

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाडा जेट्टी परिसरात फिरायला गेलेल्या एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दोघा लुटारूंनी लाकडी दांडक्याने मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सुगंध मंगल्या म्हात्रे (६४, रा. काळूबाई मंदिर परिसर, देवीचा पाडा) हे नेहमीप्रमाणे रविवारी (दि. २४) पहाटे साडेपाचच्या सुमारास सत्यवान चौकातील जेट्टी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी अचानक त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. म्हात्रे खाली पडताच लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची ६२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दुखापत आणि पोलिसांची कारवाई

मारहाणीत सुगंध म्हात्रे यांच्या उजव्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर आरडाओरडा केल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दुचाकीवरून घरी सोडले. त्यानंतर प्राथमिक उपचार घेऊन त्यांनी सायंकाळी ७ वाजता विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (६) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि त्यांच्या टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे.

पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी एकटे फिरणे टाळावे. परिसरात कोणताही संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित ११२ या क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news