Dombivli gas leak explosion | डोंबिवलीच्या खंबाळपाड्यात मोठा अनर्थ टळला : गॅस पाईपच्या गळतीने उडाला आगीचा भडका

सुदैवाने जीवित-वित्तहानी नाही, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Dombivli Accident | डोंबिवलीच्या खंबाळपाड्यात मोठा अनर्थ टळला : गॅस पाईपच्या गळतीने उडाला आगीचा भडका
Dombivli Accident | डोंबिवलीच्या खंबाळपाड्यात मोठा अनर्थ टळला : गॅस पाईपच्या गळतीने उडाला आगीचा भडका
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या खंबाळपाडा परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास महानगर गॅसच्या पाईपलाईनला गळती सुरू झाली. थोड्याच वेळात गॅसची गळती होऊन आगीचा भडका उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

   या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात असलेल्या भोईरवाडीतीन मॉडेल कॉलेज परिसरात ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी गॅसचा वास येत असल्याचे लक्षात येताच तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती दिली. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. सदर पाईपलाईन महानगर गॅस लिमिटेडची असल्याचे समजते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी पथक घटनास्थळी पोहोचले आणि तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. ३ वाजून ३२ मिनिटांनी पथकाने परिसर सुरक्षित घोषित केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. गॅसची गळती नियंत्रणात आल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पुढील तांत्रिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news