Diwali celebration 2026: आज अभ्यंगस्नान; सायंकाळी लक्ष्मीपूजन

दीपोत्सवाचा आनंद शिगेला, बाजारपेठांत उत्साहाला उधाण; घरे उजळली
Diwali celebration 2026
Diwali celebration 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: पहाटे अंगणात पणत्यांची आरास, सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नान, नव्या कपड्यांचा साज, फराळाचा दरवळ आणि सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या निमित्ताने उजळणारे घर... अशा आनंददायी वातावरणात रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) दिवाळीचा उत्सव अधिकच रंगणार आहे. यंदा तिथींच्या संयोगामुळे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने पुणेकरांना दिवाळीचा दुहेरी आनंद अनुभवता येणार आहे.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. पहाटे उठून सुगंधी उटणे लावून स्नान करण्यात येणार आहे.

नवीन कपडे परिधान करून देवदर्शन, फराळ आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह दिवाळीच्या आनंदाला सुरुवात होणार आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. घरात प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता करून प्रवेशद्वारापासून देवघरापर्यंत आकर्षक सजावट केली जाणार आहे.

Diwali celebration 2026
Komal Punjabi: विधी खात्याच्या अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर! कायदा विभागाचा कार्यभार सुखश्री मोदले यांच्याकडे

दारात रांगोळी, फुलांची तोरणे, आकाशकंदील आणि पणत्यांची आरास केली जाणार असून, दिवसभर घरोघरी दिवाळीचा आनंद बहरणार आहे. सायंकाळी मुहूर्तावर लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करून सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. कुटुंबीय एकत्र येऊन भक्तिभावाने पूजा करणार आहेत.

लक्ष्मीपूजनाला व्यापारी वर्गासाठीही विशेष महत्त्व आहे. शहरातील दुकाने, कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांची स्वच्छता करून त्यांना फुलांची तोरणे आणि आकर्षक विद्युतरोषणाईने सजविण्यात आले आहे.

Diwali celebration 2026
Kandivali Stall Demolition: कांदिवलीत ५० वर्षे जुना स्टॉल पाडल्याने संताप; शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

व्यापारी लक्ष्मीपूजनासोबतच चोपड्या, वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाचे पूजन केले जाईल. दिव्यांच्या प्रकाशात आनंद, समाधान आणि नव्या आशा पल्लवित करणारा हा सण घराघरांत चैतन्याची उधळण करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.