Thane News : लहान मुलांना बाथरूममध्ये वापरण्यास खड्ड्याचे घाणपाणी

दिव्यातील शाळेत किळसवाणा प्रकार
School News
लहान मुलांना बाथरूममध्ये वापरण्यास खड्ड्याचे घाणपाणीFile Photo
Published on
Updated on

आरती परब

दिवा : दिवा शहराच्या पूर्वेकडील असलेल्या शाळेत मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील लहान मुलांना बाथरुममध्ये थेट खड्ड्यातील गटारमिश्रित घाण पाणी वापरायला लावल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, हा प्रकार दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान उघड केला.

School News
Thane Metro : ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी 223 कोटींची निविदा

ही तक्रार प्रथम दिवा मनसे महिला बेडेकर शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे काही पालकांनी केली. तक्रारीतील आरोपांची खात्री करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शाळेला दुपारच्या वेळी भेट दिली असता, बाथरुममध्ये स्वच्छ पाण्याऐवजी घाण पाणी वापरले जात असल्याचे उघड झाले. यामुळे मुलांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप करत शाळेचे संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

या प्रकाराचे व्हिडिओ पुरावे मनसे पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांना पाठवले असता, त्यांनी तत्काळ चौकशीसाठी शिक्षण विभागाची विशेष टीम पाठवत असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मुलांना सुरक्षित पर्याय म्हणून इतर शाळेत हलवावे, अशी ठाम मागणी दिवा मनसेकडून करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम, उपशाध्यक्ष जितेंद्र गुरव हे पदाधिकारी उपस्थित होते.

School News
Thane News : डोंबिवली स्थानकावरील नवीन सरकता जिना पुन्हा बंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news