Diva railway station assault : दिवा रेल्वेस्थानकात वर्गणीसाठी मारहाण

कटरने केला हल्ला; आरोपी गजाआड
Diva railway station assault
दिवा रेल्वेस्थानकात वर्गणीसाठी मारहाणPudhari Photo
Published on
Updated on

ठाणे :वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या मूळच्या बीडच्या अशोक बाजीराव डुमरे (55) यांच्यावर कटारसारख्या धारदार शस्त्राने दिवा स्थानकात हल्ला करण्यात आल्याची घटना 2 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीसानी आरोपी बबलू याला सापळा रचून दिवा परिसरातून अटक केली.

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केलेल्या बबलू याच्या विरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हल्लेखोराला अटक करून त्याच्याकडून लोखंडी ब्लेड असलेला हिरव्या रंगाचा प्लास्टिक कव्हरयुक्त कटर जप्त करण्यात आला आहे.

Diva railway station assault
Mumbai Pune Expressway‌ traffic jam : ‘मिसिंग लिंक‌’ लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलिस हवालदार सुतार, पोलीस शिपाई केदार, बैनाडे व महाजन यांनी डी. बी. पथकाच्या मदतीने सापळा रचत हल्लेखोराला दिवा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आणून 2 फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एच. सुतार करत आहेत.

Diva railway station assault
Wada Rural Hospital upgrade : वाडा उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news