Dombivli bus attack : अटाळीत भाविकांच्या बसवर इराणी टोळीचा हल्ला

दुचाकीने कट मारल्याचा जाब विचारला
Dombivli bus attack
अटाळीत भाविकांच्या बसवर इराणी टोळीचा हल्लाpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : राज्याच्या विविध भागात देवदर्शन करून आंबिवली स्टेशनजवळील अटाळी गावात परतणाऱ्या भाविकांच्या बसवर रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास 10 महिला-पुरुषांच्या इराणी टोळीने हल्ला करून दगडफेक केली. या हल्ल्यात दुर्गेश राजेश पाटील (24) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कविता पाटील आणि सुवर्णा पाटील या दोन महिलाही दगड लागून जखमी झाल्या आहेत.

या संदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या आठवड्यात अटाळी आणि वडवली भागातील 40 भाविक देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ते खासगी बसने वडवलीहून अटाळी गावाकडे परतत होते. इतक्यात समोरून मुंढा नावाचा इराणी तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने बसला जोराने कट मारली.

Dombivli bus attack
Mungi Ghat Kawad Sohala | मुंगी घाटात ‘हर हर महादेव’चा जयघोष; कावड चढवण्याचा पारंपरिक सोहळा भक्तिमय वातावरणात

चालकाने सावधगिरी बाळगल्याने बस कलंडण्यापासून वाचली. मात्र मुंढाने पुढे जाऊन बससमोर दुचाकी आडवी लावली आणि चालकाला खाली उतर, तुला बघतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे रंजना पाटील यांचा मुलगा दुर्गेश पाटील बसखाली उतरून जाब विचारू लागला. त्यावर मुंढाने दुर्गेशला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. भाविक त्याला रोखण्यासाठी खाली उतरले. मात्र तेवढ्यात इराणी काबिल्यामधील 10 महिला-पुरुष धावत आले आणि त्यांनी भाविक व बसच्या दिशेने दगडफेक केली.

Dombivli bus attack
Hubli Sairat incident | हुबळीजवळ ‘सैराट’; बापाकडून गर्भवती मुलीचा खून

या दगडफेकीत एक दगड दुर्गेश पाटील याच्या डोक्याला लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. कविता पाटील व सुवर्णा पाटील यांनाही दगड लागले. दुर्गेशला तातडीने कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात नेले. मात्र जखम गंभीर असल्याने त्याला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.

गुन्हा नोंदवून तपास सुरू

याप्रकरणी मुंढा या इराणी तरूणासह इतर 10 इराणी हल्लेखोर महिला-पुरूषांविरुद्ध खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news