

BJP Protest Thane
ठाणे : दिल्लीत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन होत असताना ठाणे भारतीय जनता पार्टीतर्फे ठाण्यासह देशात पसरत चाललेली अराजकता आणि भीडतंत्र याच्या निषेधार्थ रविवारी (दि.१) लोकतंत्र बचाव पदयात्रा' निघणार आहे. ही पदयात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वन मंत्री गणेश नाईक प्रमुख नेतृत्वाखाली लोकशाही वाचविण्यासाठी ठाणेकर रस्त्यावर उतरणार आहेत.
ठाण्यासह देशभरात आंदोलनाच्या नावाखाली समाजात वाढत चाललेली अराजकता आणि भीडतंत्र यांच्या विरोधात तीव्र निषेध या पद यात्रेद्वारे केला जाणार आहे. रविवारी (दि. १) सकाळी १० वाजता ठाणे महापालिका जवळील परमार्थ निकेतन येथून सुरू होईल. त्याचवेळी पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांसह नेते मंडळी मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर पुढे चंदनवाडी, अलमेडा चौक, दगडी शाळा मार्गे तलाव पाळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर विसर्जित होईल.
देशात सुरू असलेल्या लोकशाही विरोधी व लोकनियुक्त सरकारविरोध आंदोलनांना विरोध आणि ठाण्यासह देशात सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपने केले आहे.