ठाणे जिल्हा परिषदेची विकासकामे होणार पारदर्शक

ऑनलाईन कामे वाटप; ठेकेदारांच्या मक्तेदारीला बसणार आळा
ठाणे जिल्हा परिषद
ठाणे जिल्हा परिषदpudhari news network
Published on
Updated on

ठाणे : ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेमार्फत आता विकासकामांचे ऑनलाईन वाटप सुरु करण्यात आले आहे. पूर्वीची चिठ्या काढून विकासकामे वाटप करण्याची पद्धत आता बंद करण्यात आली असून, यामुळे ठेकेदारांच्या मक्तेदारीला आळा बसणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यासाठी ठोस पावले उचलली असून, ठाणे जिल्हा परिषद ही कामवाटप ऑनलाईन पद्धतीने राबवणारी राज्यातील सातवी तर पेमेंट गेटवे वापर करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची कामे वाटप प्रक्रिया पूर्वी चिठ्ठया काढून लॉटरी पद्धतीने राबविण्यात येत होती. त्यामुळे कागदपत्रांचा वापर जास्त प्रमाणत होत होता. तसेच जमा झालेली रक्कम चलनाद्वारे बँकेत भरावी लागत होती. आता ऑनलाईन प्रक्रियेत स्टेशनरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून निविदा रक्कमेचा भरणा हा संबधित सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे कामकाज वेगवान व पारदर्शक होणार आहे.

ठाणे जिल्हा परिषद
ठाणे महानगरपालिका हद्दीतील १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश होणार

166 विकासकामांचे वाटप

सन 2024-25 या वर्षासाठी विकास कामे प्राप्त करण्यासाठी अभियंते आणि ठेकेदारांनी शज्ञराुरींरिींहरपशूि.ळप या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते. त्यासाठी 866 अर्ज प्राप्त झाले. यापैकी 166 विकासकामांचे वाटप नुकतेच बी. जे. हायस्कूल येथे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात आले.

ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेतल्याने काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक होणार आहे. यामुळे वेळेची बचतही होणार आहे. पुढील कामवाटप नियोजन ऑनलाईन लॉटरी पद्धतीने फेसबुक, युट्यूब द्वारे लाईव्ह करण्यात येईल.

रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news