Dementia cases in India : स्मृतीभ्रंशाचा विळखा होतोय घट्ट

महाराष्ट्रात सुमारे १० लाख ज्येष्ठ या आजाराने ग्रस्त
Dementia cases in India
Dementia cases in Indiapudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : अनुपमा गुंडे

आयुष्याच्या उत्तरायणात घोंगावणाऱ्या आजारात आता स्मृतीभ्रंशाच्या विळख्याची भर पडते आहे. अल्झामायर रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जगात ५ कोटी ७० लाख ज्येष्ठ स्मृतीभ्रंशाने (डिमेंशिया) ग्रस्त असून भारतात सुमारे ७२ लाख ज्येष्ठांच्या लोकसंख्येला या आजाराने ग्रासले असून महाराष्ट्रात सुमारे १० लाख ज्येष्ठ या आजाराचा सामना करत आहेत. प्राथमिक पातळीवर स्मृतीभ्रंशाचे निदान झाल्यावर योग्य ती काळजी, उपचार सामाजिक, आरोग्य आणि कौटुंबिक पातळीवर मिळाल्यास स्मृतीभ्रंशाची पकड सैल होण्याची शक्यता आहे, मात्र शासकीय पातळीवर ज्येष्ठ आणि ज्येष्ठांचा या आजाराच्या विसर व दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागात या आजाराने ग्रस्त ज्येष्ठांची परवड सुरू आहे.

मनाच्या कुपीत जपलेले आठवणींच्या सुख-दुःखांच्या क्षणांची शिदोरी वानप्रस्थाश्रमात रिती करून जगणारी भारतीय जीवनशैली आहे. मात्र ही शिदोरी घेऊन जगणे प्रत्येकाच्या वाट्याला येते असे नाही, अशी आजची परिस्थिती आहे. वाढते आयुर्मान, बदलती कुटुंब व्यवस्था, जीवनशैली, समाजव्यवस्था या सगळ्यांचा परिणाम ज्येष्ठांच्या जीवनावर होतो आहे. त्यातून मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग बरोबरच स्मृतीभ्रंशसारखे आजारांनी डोके वर काढले आहे, त्याचा परिणाम ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यावर वेगाने होतो आहे. भारतात प्रामुख्याने अल्झायमर आणि व्हॅस्क्युलर डिमेंशिया आजारांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असल्याने व्हॅस्क्युलर डिमेंशिया बळावतो असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय कुमावत यांनी नोंदविले.

Dementia cases in India
Mumbai manhole death : साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणातील आरटीआय अर्जाची भटकंती

महिलांमध्ये वाढते प्रमाण

पाळी गेल्यानंतर शरीरातील संरक्षित संप्रेरके कमी होतात. त्यामुळे महिलांमध्ये स्मृतीभ्रंशाचे प्रमाण वाढते आहे. पाश्चात्य देशात स्मृतीभ्रंशाचा आजार ही मोठी समस्या आहे. जपान, अमेरिका, यात विकसित देश आहे. ग्रामीण भागात स्मृतीभ्रंशाच्या आजारात सामावून घेतले जातात. हे लक्षात येत नाही, आपली आरोग्य व्यवस्था तेवढी प्रगत

डिमेंशियाचे प्रकार

  • अल्झायमर डिमेंशिया : स्मरणशक्ती कमी होते, नवीन शिकवलेल्या गोष्टी लक्षात राहात नाही, निर्णय घेणे, सारासार विचार करणे या गोष्टी कमी होतात. त्यामुळे वर्तनात फरक पडतो, ही लक्षणे आढळणारा माणूस शांत बसून राहतो, झोपेचे चक्र बिघडून जाते.

  • व्हॅस्क्युलर : शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे, रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूच्या उच्च प्रतीच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे शरीराच्या चालण्याच्या हालचालींचा अंदाज घेता येत नाही. शरीरात होणारे हे बदल जाणवत असल्याने नैराश्य आणि मानसिक त्रास होतो.

  • लेवी बॉडी : कानांचे आणि मनाचे भास होतात. झोप बिघडलेली असते. व्यक्ती गोंधळलेली असते. स्थळ, वेळ, काळ याचे भान उरत नाही, सतत असुरक्षितेतेची भावना जाणवत असल्याने नातेवाईकांवर आरोप करणे, या व्यक्ती भूतकाळात जगत असतात.

  • फ्रंटोटेम्पोरल : संभाषणावर, शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. कळत असते; परंतु बोलण्यासाठी शब्द सुचत नाही, त्यामुळे चीडचीड वाढते. त्यातून व्यक्ती आक्रमक होऊ शकतात.

Dementia cases in India
Raigad News : मुदतबाह्य वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या स्विगी इन्स्टावर कारवाई
  • ६५ ते ७४ वयोगटात ५ तर ७५ ते ८४ वयोगटात १३ टक्के तर त्यावरील वयोगटात सुमारे ८५ टक्के ज्येष्ठ या आजाराने ग्रस्त आहेत.

  • २०३० मध्ये ही संख्या ७ कोटींच्या घरात जाणार आहे. भारतातही ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येत या आजाराचे आव्हान आरोग्य व्यवस्थेपुढे उभे करणार आहे.

महानगरे आणि शहरी भागात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. कौटुंबिक आणि सामाजिक कारणामुळे ज्येष्ठांचा सामाजिक संपर्क कमी होतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर मनोरंजनाच्या कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत, पूर्वी समाज कल्याण विभागामार्फत समाज कल्याण केंद्रे चालविली जात. तिथे त्यांचा वावर असे. या केंद्रात टी. व्ही. कॅरम बोर्ड, वर्तमानपत्रे असायची. अशी केंद्रे सरकारने पुन्हा सुरू करायला हवीत. या केंद्रामध्ये वाचनासाठी पुस्तके, चित्रपट दाखविण्याची सोय असावी, छोटा बगीचा यासारख्या सोयी दिल्यास त्यांचा वेळ चांगल्या पद्धतीने घालविता येईल. स्मरणशक्ती केंद्रेही असायला हवीत.

डॉ. संजय कुमावत, मानसोपचार तज्ज्ञ निवृत्त - अधीक्षक - प्रादेशिक मनोरुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news