ठाणे : उल्हासनगरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये ७०० रुपयांची वाढ

उल्हासनगरातील दिव्यांगांना पेन्शनमध्ये ७०० रुपयांची वाढ
महानगरपालिकेत दिव्यांग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. अझिझ शेख. समवेत आदी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव आदी.
महानगरपालिकेत दिव्यांग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. अझिझ शेख. समवेत आदी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव आदी.pudhari news network

उल्हासनगर : महानगरपालिकेत दिव्यांग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. अझिझ शेख यांनी उल्हासनगरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये ७०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे दिव्यांगांना १५०० वरून २२०० रुपये मिळणार आहेत. आयुक्तांच्या या निर्णयामुळे दिव्यांग सुखावून गेले असून ऑगस्ट २०२४ महिन्यापासून पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शहरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, प्रलंबित प्रन्न मार्गी लावावेत, विविध सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्या दिव्यांग प्रतिनिधींनी आयुक्त डॉ. अझिझ शेख यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार डॉ. शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, उपमुख्य लेखा परीक्षक विलास नागदिवे, लेखाधिकारी संजय वायदंडे, दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव आदीची बैठक पार पडली. त्यात डॉ. अझिझ शेख यांनी यापूर्वी मिळणाऱ्या दिव्यांगांच्या १५०० रुपये पेन्शनमध्ये ७०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

मोफत प्रवासाची सुविधा देखील

यासोबतच सर्व दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यामुळे त्यांना उल्हासनगर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. व्यायामशाळा, बेघर दिव्यांगासाठी वेगळे भवन व रात्र निवारा केंद्र उभारण्यात येणार असून व्यवसायासाठी चालना देण्यात येणार आहे. तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महापालिका अंतर्गत शौचालयामध्ये देखभालीकरीता दिव्यांग व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news