

नेवाळी : पावसाळी भात पिकाच्या लागवडीसाठी नंतर ग्रामीण भागात उन्हाळी पीक लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, वाल, मूग, हरभरा,चणे यांची लागवड होत होती. मात्र त्यासोबत शेतकर्यांनी यंदा भुईमूग व मसूर या पिकांची देखील लागवड केली आहे. कृषी विभागाचे अधिकारी बळीराजाला मार्गदर्शन करायला शेतात उपलब्ध होत असल्याने यंदा विक्रमी पिकांचे उत्पादन घेण्याचे लक्ष बळीराजाने केला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील बहुतांश भागात बारमाही पीक घेतली जातात. यामध्ये उन्हाळ्यात सर्वाधिक फळ भाज्या, पाले भाज्या तसेच कडधान्य लागवड केली जाते. यंदा शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात भाज्यांसह कडधान्य लागवड केल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः कृषी अधिकारी शेतकर्यांच्या शेतात प्रत्यक्ष त्यांना मार्गदर्शन करत असल्याने बळीराजाला देखील शेती करण्यासाठी उत्साह आल्याचे दिसून येत आहे.
इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला सध्या वालाच्या शेंगांना प्रचंड मागणी वाढली आहे. थर्टी फस्ट सह पोपटीसाठी मागणी वाढल्याने शेंगांचे दर देखील सध्या बाजारात वधारले दिसून येत आहे. बाजारात कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या शेतीला चांगले यश आल्याने बळीराजाच्या चेहर्यावर हसू फुलत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात शेंगा विक्रीसाठी घेऊन जाण्याची आवश्यकता सध्या बळीराजाला भासत नाही. गावाजवळ असलेल्या बाजारपेठेच्या नाक्यावर सर्व विक्री कमी वेळात अधिक होत असल्याने बळीराजा आनंदात असल्याचे दिसून येत आहे.