Shahapur Rain : शहापूरात समाधानकारक पाऊस; मुंबईकरांच्या आशा पल्लवीत

पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
Shahapur Rain
Shahapur Rainpudhari photo
Published on
Updated on

आसनगाव : शहापूर तालुक्यात ३० जूनच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शहापूर तालुक्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही महत्त्वाची धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या २४ तासांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणांतील जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

Shahapur Rain
Kalammawadi Dam : ‘काळम्मावाडी’त वापराचे केवळ पाऊण टीएमसी पाणी

जूनअखेरीस अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा चिंतेचा विषय ठरत होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईबाबतची भीती कमी झाली आहे.

Shahapur Rain
Nashik Haranbari water issue | हरणबारीच्या पाण्यासाठी मोसम खोऱ्यात आक्रोश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news