Dolkhamb Rain: डोळखांब परिसर जलमय; पूरस्थितीने नागरिकांची धावपळ

ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने माजवला हाहाकार
Dolkhamb Rain
Dolkhamb RainPudhari
Published on
Updated on

दिनेश कांबळे

डोळखांब: डोळखांब येथे रविवारी दुपारच्या सुमारास ढगफुटीसदृश झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. अवघ्या काही मिनिटांत कोसळलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि डोळखांबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. रस्ते, दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि सार्वजनिक ठिकाणे जलमय झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. यावेळी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुख्य रस्त्यांवर गुडघाभर ते कंबरेपर्यंत पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली, तर नागरिकांना जीव मुठीत धरून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.

Dolkhamb Rain
Kalyan FDA Raid: तुकाराम मुंढेंची कल्याण-डोंबिवलीवर करडी नजर; कल्याणमध्‍ये विनापरवाना लाखोंचा औषधसाठा जप्त

स्थानिकांच्या मते, डोळखांब मध्ये इतक्या कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाला. नाले, गटारे क्षणार्धात तुडुंब भरून वाहू लागल्याने पावसाचे पाणी थेट बाजारपेठेत घुसले. संपूर्ण परिसर जलमय झाला.

Dolkhamb Rain
Thanehnave Bridge Reconstruction: ठाणेन्हावेच्या लोखंडी पुलाची होणार उभारणी; ग्रामस्थांच्या मागणीला यश

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना सुरू केल्या. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news