

कल्याण : सतीश तांबे
डोंबिवली पूर्वेकडील एका स्मशानभूमीत बाल कामगार काम करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात व्हायरल होते आहे. यावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार राजेश मोरे यांनी येथील ठेकेदारावर कारवाई करावी व ठेका रद्द करावा, अशी प्रशासनाकडे केली आहे.
बाल कामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा कायदा, 2016 हा कायदा 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला. या कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले जाते. या कायद्याने 14 ते 18 वयोगटातील मुलांनाही धोकादायक कामांवर काम करण्यास बंदी घातली आहे. 14 वर्षाखालील मुलांवर कामावर बंदी असून या कायद्यानुसार, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या कामावर ठेवता येत नाही. डोंबिवलीतील स्मशानभूमीत एका लहान मुलाने खांद्यावर लाकडे उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत आमदार राजेश मोरे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की त्या स्मशानभुमीत बाल कामगार असतील तर तशी माहिती घेतो. जर तिथे बालकामगार असतील तर जो कोणी ठेकेदार असेल त्याचा ठेका रद्द झाला पाहिजे, असे सांगितले.