Bhiwandi Crime: विटभट्टीवर काम करणाऱ्या महिला मजुराची सोशल मीडियावर बदनामी, दोघांविरोधात गुन्हा; 'श्रमजीवी'चा दणका

दोघांविरोधात भिवंडी गणेशपुरी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
Cyber Crime News
crime newsPudhari
Published on
Updated on

भिवंडी : समाज माध्यमांद्वारे फेसबुक पोस्ट व व्हॉट्सअप स्टेटसद्वारे एका आदिम कातकरी महिला विटभट्टी मजुराची बदनामी केल्याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. प्रमोद पवार (रा.अंबाडी) व सुनिल लोणे (रा. दाभाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी सोशल मीडियावर टंकलिखित मजकूर व कथित कॉल रेकॉर्डिंग प्रसारित केले होते. या मजकुरामध्ये एका विटभट्टीवर काम करणाऱ्या महिला मजुराच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल, असा बदनामीकारक आशय पसरवण्यात आला. यामुळे पीडित महिलेला मानसिक त्रास व लज्जास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले. या संकटाच्या काळात फिर्यादी महिलेचा भावाने श्रमजीवी संघटनेकडे धाव घेतली. त्याने संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी आणि भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्षा आशा भोईर यांच्याकडे तक्रार मांडली.

Cyber Crime News
Senior litterateurs honorarium : वृद्ध साहित्यिक, कलावंत यांचे मानधन रखडले

पदाधिकाऱ्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन तिची बाजू ऐकून घेतली आणि तिला धीर दिला. त्यानंतर संघटनेच्या प्रयत्नाने गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, तालुका उपाध्यक्ष सागर देसक, भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्षा आशा भोईर, कार्यालयीन सचिव प्रतीक्षा सांबरे, तालुका महिला सचिव आशा चौधरी, महिला प्रमुख रोहिणी पवार, संगीता भड, स्वाती शिंदे आणि माजी अध्यक्षा सुनीता भावर यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Cyber Crime News
Goregaon twin tunnel project : जुळ्या बोगद्यांचे काम लवकरच सुरू

याप्रकरणी दोघांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79, 356(2) तसेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव करीत असून सोशल मीडियावरील डिजिटल पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंगची सखोल चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news