Cancer Care Mobile Bus | कर्करोग निदान बस ठरतेय दुर्गम रुग्णांसाठी आशेचा किरण

गावपाड्यात मौखिक, स्तन व गर्भाशय, मुख कर्करोगाची निशुल्क तपासणी
World Cancer Care Mobile Buses
कर्करोग निदानासाठी ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली मोबाईल बस दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : कर्करोग निदानासाठी ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली मोबाईल बस दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. या बसद्वारे दररोज 100 ते 120 नागरिकांची मौखिक, स्तन, व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी नि:शुल्क केली जात आहे. या व्हॅनमुळे दुर्गम भागातील नागरिकांचे कॅन्सरचे वेळेत निदान आणि उपचार करणे शक्य झाले आहे. (World Cancer Care Mobile Buses)

कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची वेळेवर ओळख होत नाही. त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात. मात्र अचानक कर्करोगाचे निदान झाल्यावर मनात नको ती शंका निर्माण होते. त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर यापासून बचाव करता येणे शक्य आहे. या मोबाईल बसमुळे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळणे शक्य होत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचा उपक्रम

कर्करोग निदान मोबाईल बसचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. त्यानंतर, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ आदी भागांमध्ये या बसद्वारे तपासणी केली जात आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागांतील रुग्णांना ही सेवा मिळावी म्हणून आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा शल्य दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली असून जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील नागरिकांना ही सेवा पुरवण्यात येणार आहे.

कर्करोग निदान मोबाईल बसमुळे वेळेवर तपासणी होऊन रुग्णांवर तत्काळ उपचार करता येणार आहेत.

डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

अशी आहे व्हॅनची रचना

व्हॅनमध्ये तपासणी कक्षा आहे स्तन, गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी लागणारे कॉल्पोस्कोप यंत्र आहे. मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर आहे. व्हॅनमध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टरांसह 6 कर्मचारी असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news