

ठाणे : कल्याण शिळ रस्त्यावरील देसाई गावात बुधवार (दि.7) रोजी आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र मंगळवार (दि.7) रोजीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मैदानाला नदीचे स्वरूप आलं आहे. परिणामी बुधवार (दि.7) रोजी आज आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती रद्द केल्याची घोषणा ग्रामस्थांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील देसाई गावात वाघेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बैलगाडा शर्यती रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. देसाई गावात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतींना ठाणे, रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमी येणार होते. मात्र मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे बैलगाडा प्रेमींना शर्यती रद्द केल्याची घोषणा ग्रामस्थांनी केली आहे.