

नेवाळी : निवडणुकांचा कालखंड संपल्यानंतर आता पुन्हा बैलगाडा शर्यतींना जोर धरला आहे. अंबरनाथ तालुक्यातील पहिला शासनाच्या मान्यतेने उसाटने येथे बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित बैल जोड्यांसह बैल प्रेमी देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील पहिली अधिकृत स्पर्धा निवडणुकीनंतर झाल्याने प्रेक्षकांनी मोठी गर्दी पहावयास केलेली दिसून आली आहे.
अंबरनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत असत. या स्पर्धा मुख्यत: काकडवाल, बोहणोली, उसाटने या गावांमध्ये भरविण्यात येतात. नुकत्याच झालेल्या उसाटने येथील नियोजनबद्ध स्पर्धेत राज्यभरातील नामांकित बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या जोडयांना आयोजकांकडून आकर्षक बक्षिसांची खैरात देखील करण्यात आली आहे. पावसाळयात ठाणे जिल्ह्यातील बैलजोड्या घाटावर असतात. मात्र पावसाळा झाल्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्याने जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या नव्हता. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा एकदा जोमानं सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.
बैलगाडा शर्यतीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये साठी कंबर कसली जात आहे. पोलिसांसह ग्रामस्थांच एक पथक देखील हालचालींवर लक्ष ठेवून असत. त्यामुळे उसाटने येथे होणारी बैलगाडा शर्यत सध्या राज्यभरात चर्चेत येत असल्याचे दिसून येत आहे. तर पोलीस महसूल विभागाचे अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी देखील या शर्यतीच्या जागी उपस्थित असल्याने शांततापूर्ण शर्यत पाहण्यास प्रेक्षक देखील गर्दी करताना दिसून येत आहेत.
कल्याण पूर्वेतील उसाटने गावाला बैलगाडा शर्यतींची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कमिटीचे सचिन भंडारी, प्रवीण पाटील, महेश पाटील, गुरुनाथ पाटील यांसह अन्य टीम सातत्याने काम करत असतानाच चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील उसाटने गावच्या बैलगाडा शर्यती सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेला आल्या आहेत.