

ठाणे : दिलीप शिंदे
जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार (दि.12) रोजी आज संध्याकाळी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवून भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पराभव करण्यास कारणीभूत ठरले होते. त्यांनी खासदार बाल्यामामा म्हात्रे यांना काट्याची टक्कर दिली होती.
आदिवासी समाजासाठी जिजाऊ संस्थांच्या मदतीने सांबरे यांनी समाजसेवेत मोठे कार्य केले आहेत. गरीबांना सरकारी नोकरी मिळावी याकरिता मोफत प्रशिक्षण आणि अभ्यासिका सुरू केल्या आहेत. नुकतेच रत्नागिरी तेथे एका दवाखान्याचे उद्धाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याचवेळी सांबरे हे शिंदे सेनेत जाणार हे निश्चित मानले जात होते.