Son kills Mother: दारूसाठी पैसे न दिल्याने संताप! पोटच्या मुलाकडून 65 वर्षीय आईची निर्घृण हत्या

संगीता राजकुमार साहेब (65) असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे.
Son kills Mother
Son kills MotherPudhari
Published on
Updated on

भिवंडी: दारूसाठी पैसे नाकारल्याने पोटच्या मुलाने 65 वर्षीय आईची धारदार चाकूने निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कशेळी येथील एका सदनिकेत घडली आहे. संगीता राजकुमार साहेब (65) असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे.

भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून सदर तपास कापूरबावडी पोलिसांकडे सोपवला आहे. मंगेश राजकुमार साहेब (29) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Son kills Mother
Dharavi News: धारावीकरांनो, पावसाळ्यापूर्वी घरे सोडा! डीआरपीची सूचना

मृत आई संगीता या ठाण्यातील ढोकाळी गावातील देवी मंदिराच्या जवळ राहत होत्या. 13 एप्रिल रोजी, त्या भिवंडी येथे आपल्या मुलीला भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी मंगेशने आई संगीता यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. त्यास आईने नकार दिल्यावर तो संतापला. त्यानंतर पहाटे 2 वाजता आरोपी मंगेशने धारदार चाकूने आईच्या चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून आईचा खून केला आहे. मृत महिलेच्या मुलीच्या तक्रारीच्या आधारे, नरपोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news