Bhiwandi Industrial Fire : भिवंडीत डाइंग कारखान्यास भीषण आग

सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी घडलेली नाही
Mithpada Dyeing Company Fire
Mithpada Dyeing Company Firepudhari photo
Published on: 
Updated on: 

भिवंडी : भिवंडी शहरानजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मीठ पाडा येथील शत्रुंजय या धाग्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीत मंगळवारी दुपारी भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.

या कंपनीमध्ये तिसऱ्या मजल्यावर ही आग लागण्याची घटना घडली. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कच्चा धागा रंग प्रक्रिया करण्यासाठी साठवण्यात आलेला होता. जो या आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी घडलेली नाही.

Mithpada Dyeing Company Fire
Raigad Historical Places : सुधागडातील प्राचीन लेण्यांचा अमूल्य ठेवा; शिल्पकलेचा भक्कम पुरावा

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर चार तासांनी ही आग आटोक्यात आली आहे.

दरम्यान आगीचे कारण अजून अस्पष्ट असून स्थानिक भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस या दुर्घटनेची चौकशी करीत आहेत.

Mithpada Dyeing Company Fire
Thane Water Cut : मुंब्रा-दिव्यावर पाणीकपातीची कुऱ्हाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news