

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कॉम्प्लेक्स येथील इलेक्ट्रॉनिक साहित्य साठवलेल्या गोदामात शनिवारी सकाळी अचानक आग लागण्याची घटना घडली.गोदाम इमारती मधील दुसऱ्या मजल्या वर नाईन टू नाईन इलेक्ट्रॉनिक हे गोदाम आहे.
येथे मोठ्या प्रमाणावर टीव्ही,डीप फ्रिजर, वातानुकूलित यंत्र,फ्रिज यांचा साठा करण्यात आला होता. सकाळी दहा वाजताच्या सुमारास या गोदामात आग लागली.पाहता पाहता आग सर्वत्र पसरल्याने या आगीच्या भक्ष्यस्थानी विविध नामांकित कंपन्यांचे 200 स्मार्ट टीव्ही तसेच डीप फ्रीझर जळून खाक झाले आहेत.या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी दोन तासात आग आटोक्यात आणली आहे.मात्र आगीचे कारण कळू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.