

भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात शुक्रवारी (5) रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास बालाजी डाईंग या कपड्यावर रंग प्रक्रिया करणार्या कंपनीस भीषण अशी आग लागण्याची घटना घडली आहे.
कंपनीत मोठ्या प्रमाणावर कच्चा कपडा रंग प्रक्रियेचे साहित्य व केमिकल साठवले असल्याने पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण दोन मजली इमारत जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले त्यास आठ तासांनी यश आले.
या कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकल साठवले असल्याने ही भडकल्याचे बोलले जात आहे. कंपनीतील वाचलेला कच्चा कपडा कामगारांकडून बाहेर काढला गेला. दरम्यान, आग नक्की कशामुळे लागली त्याचं कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.परंतु कंपनीतील कोट्यवधी रुपयांची सामुग्री जळून खाक झाली.