भिवंडी : नराधमाचे कुकर्म; नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

आरोपीस गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
Bhiwandi : Crime of murder; A nine-year-old girl was raped and killed
अल्पवयीन मुलीवर अत्याचार file photo
Published on
Updated on

भिवंडी : शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने नऊ वर्षाच्या चिमुरडीवर खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करून तिची हत्या करून फरार झाला. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रात्री उशिरा भिवंडी गुन्हे शाखेने संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका इमारतीत भाड्याने पीडितेचे कुटुंब राहते. आई-वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब आहे. वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात कामाला जात असताना आपल्या दोन्ही मोठ्या मुलींना सुध्दा आपल्या सोबत कामाला घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता. गुरुवारी सुध्दा हे कुटुंब दिनचर्ये प्रमाणे कामाला गेले. तर, मुलगा शाळेत गेला होता. त्यासुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने पीडित चिमुरडीस खाऊचे आमिष दाखवुन आपल्या खोलीत बोलावले.

मुलीने आपली खोली कुलूप लाऊन बंद करून नराधमाच्या खोलीत गेली. तेथे गेल्यावर नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर अल्पवयीन मुलीचा गळा आवळून तीची हत्या केली. भाऊ शाळेतून सायंकाळी घरी आला. त्यावेळी त्याला आपल्या घराला कुलूप लावलेले बघितले. यावेळी त्याने बहिणीला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु, ती सापडली नाही. त्यानंतर कामा वरून घरी परतलेल्या आई व मोठ्या बहिणींनी सुध्दा परिसरात शोधाशोध सुरू केली. दरम्यान परिसरातील एका छोट्या मुलाने पीडित मुलीला वरच्या मजल्या वरील खोलीत जाताना बघितल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन शोध घेतला असता एका बाहेरून कडी लावलेल्या खोलीत पीडितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसून आला.

हे विदारक दृश्य पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पोलिस फौजफाटा घेऊन परिसरात दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात रवाना केला.

पोलिसांनी अज्ञाता विरोधात मध्यरात्री भारतीय न्याय संहिता कायद्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला. तर मृतदेहाची शास्त्रोक्त उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह मुंबई जे जे रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा यांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. यामध्ये भिवंडी गुन्हे शाखेला यश मिळाले असून रात्री उशिरा कुकर्म करून लपून बसलेला संशयीत आरोपी अभय यादव याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयीत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशी द्यावी अशी मागणी पीडीतेच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news