Bhimrao Panchale : भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा
Bhimrao Panchale / भीमराव पांचाळे
Bhimrao Panchale / भीमराव पांचाळेPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी वरळी येथील डोम येथे होणार आहे. या सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

2024 वर्षीच्या चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Thane Latest News

Bhimrao Panchale / भीमराव पांचाळे
Thane Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने पतीचा पत्नीवर कटरने वार

60 आणि 61 वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचेही वितरण

या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणार्‍या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय, 60 आणि 61 वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचेही यावेळी वितरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकाही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.

Bhimrao Panchale / भीमराव पांचाळे
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात 'बापल्योक'चा डंका

केवळ मनोरंजन क्षेत्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातही हा हीरक महोत्सवी क्षण सोहळा अनोखा ठरणार आहे.

स्वाती म्हसे-पाटील, व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ

विनामूल्य प्रवेशिका

5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता वरळीतील डोम (एसव्हीपी स्टेडियम) येथे होणार्या सोहळ्याच्या प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, साहित्य संघ, दीनानाथ नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे येथे विनामूल्य उपलब्ध असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news