Bhatsa Dam Water Storage| भातसातील पाणीसाठा ८९.५६ टक्क्यांवर

Bhatsa Dam Water Storage-सांडव्यातून २१४.९३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू
Bhatsa Dam Water Level
Bhatsa Dam Water LevelPudhari
Published on
Updated on

शहापूर : राजेश जागरे

शहापूर तालुक्यातील मुंबई महा-नगरपालिकेसाठी महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून गुरुवार (दि. ६) रोजी सकाळच्या आकडेवारीनुसार धरणात ८९.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून आवश्य-कतेनुसार सांडव्यातून पाण्याचा विसर्गही सुरू ठेवण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी १३८.४० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.

Bhatsa Dam Water Level
Dombivali News | डोंबिवलीत मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात प्रवाशांचे आंदोलन

धरणातील उपयुक्त पाणीसाठा ८४३.७५७ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा ८७७.७५७ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. धरण क्षेत्रात गुरुवारी ३८ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २,२९३ मिमी इतका झाला आहे. धरण सुरक्षित ठेवण्यासाठी सांडव्यातून १९२.३८५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय विद्युतगृहातून २२.५५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असून एकूण विसर्ग २१४.९३५ क्युमेक्स (७,५९०.४३० क्युसेस) इतका आहे.

दरम्यान, मुंबई महानगर-पालिकेसाठी आज कोणताही पाणीउपसा नोंदविण्यात आलेला नाही. तसेच सिंचनासाठी अथवा उजव्या कालव्याद्वारेही पाणी सोडण्यात आलेले नाही. मात्र, धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने प्रशास-नाकडून धरण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास भातसा धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bhatsa Dam Water Level
Palghar Sea Airport Project - मुंबई महानगराला मिळणार तिसरा 'आकाशमार्ग'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news