Badlapur Municipal Election: बदलापूर नगरपरिषद निवडणूक; प्रभाग क्रमांक 11 मधून रेश्मा दीपक राठोड यांचा ऐतिहासिक विजय

Badlapur Municipal Election: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून रेश्मा दीपक राठोड यांचा विजय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पैसा आणि ‘मसल पॉवर’ पलीकडे जाऊन मतदार निर्णय घेऊ शकतो, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
Badlapur Municipal Election
Badlapur Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

Badlapur Municipal Election 2025: बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा दीपक राठोड यांचा विजय झाला आहे. हा विजय केवळ एका प्रभागाचा निकाल नसून, लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट करणारा आहे. पैसा, ताकद आणि सत्ताकेंद्रित राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या विश्वासावर मिळवलेला हा विजय आहे.

या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रलोभनांचे वाटप झाल्याच्या चर्चा शहरात सुरू होत्या. प्रत्येक मतदाराला सुमारे पाच हजार रुपये दिले जात असल्याच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. मात्र अशा वातावरणात कोणतेही भक्कम आर्थिक पाठबळ, राजकीय घराणेशाही किंवा पारंपरिक सामाजिक दबदबा नसतानाही रेश्मा राठोड यांनी केवळ जनसंपर्क आणि प्रामाणिक कामाच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला.

Badlapur Municipal Election
Badlapur Municipal ElectionPudhari

शैक्षणिक पार्श्वभूमी

राठोड यांनी मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. कुटुंबातून उच्च शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आज त्या याच प्रभागात लहान मुलांसाठी शिकवणी वर्ग चालवतात. शिक्षण, समाजकार्य आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण त्यांना आहे.

या यशामागे त्यांचे पती दीपक राठोड यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. कुटुंबातील समतेची भूमिका आणि महिलांच्या राजकीय सहभागाला मिळालेली साथ ही बाब लोकशाही सशक्तीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पैसा आणि ‘मसल पॉवर’ पलीकडे जाऊन मतदार निर्णय घेऊ शकतो, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शिक्षित आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील महिलांचे स्थानिक राजकारणातील वाढते प्रतिनिधित्व हे लोकशाहीच्या सुदृढतेचे लक्षण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news