बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक

Badlapur Protest | परिसरात तणाव, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन
Badlapur protest
बदलापूर स्थानकांवर आंदोलक संतप्त झाले असून दगडफेक सुरू केली आहे. Pudhari News Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर स्थानकांवर आंदोलक संतप्त झाले असून दगडफेक सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलनाला आज (दि. २०) दुपारी १ च्या सुमारास हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला. तर आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.

जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सुरक्षा तैनात

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलीसोबत झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच रेल्वे स्थानकावर संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली. तसेच शाळेवरही दगडफेक केली. दरम्यान, जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

बदलापूरमध्ये एकाच शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसचे बदलापूर स्‍टेशनवर रेल रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलकांकडून बदलापूर बंदची हाक

या घटनेने संतप्त झालेल्‍या बदलापूरकरांनी यावेळी बदलापूर बंदची हाक दिली. आंदोलकांना शांत करण्याचे पोलिसांनी प्रयत्‍न केले. मात्र या घटनेतील आरोपीसह शाळेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीवर आंदोलक ठाम होते. दरम्‍यान शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

बदलापूर रेल्‍वे स्‍टेशनवर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रेल्‍वे रूळावर आंदोलन केले. यामुळे येथील रेल्‍वेसेवा ठप्प झाली आहे. बदलापूर रेल्‍वे ट्रॅकवर संतप्त आंदोलक उतरले असून, हातात फलक घेत आंदोलकांनी आरोपीला आमच्यासमोर हजर करा अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

Badlapur protest
बदलापूरमध्ये २ चिमुकलींवर अत्‍याचार, नागरिक उतरले रस्‍त्‍यावर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news