Skydiving: रशियात १२ हजार फूट उंचीवरून विठूरायाचा जयघोष; पॅराजम्पर अजित कारभारी यांची श्री विठ्ठलाला अनोखी मानवंदना

हवाई जहाजातून उडी घेतल्यानंतर त्यांनी 'राम कृष्ण हरी' तसेच श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचा ध्वज आकाशात अभिमानाने फडकावत जगभरातील विठ्ठल भक्तांना प्रेरणादायी संदेश दिला.
Skydiving
SkydivingPudhari
Published on
Updated on

कल्याण: आषाढी एकादशीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव करणारा अनोखा उपक्रम कल्याणातील पॅराजंपर आणि स्कायडायव्हर अजित बळीराम कारभारी यांनी साकारला.

कुस्तीपटू बळीराम कारभारी यांचे सुपुत्र असलेल्या अजित कारभारी यांनी ६ जुलै रोजी रशियामध्ये तब्बल १२,००० फूट उंचीवरून पॅराशूट जंप करताना वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पेहराव धारण केला.

Skydiving
Bullet Train Project: बुलेट ट्रेनला विरोध नाही, पण दिवेकरांच्या हक्कांवर बुलडोझर चालू देणार नाही; रमाकांत मढवींचा प्रशासनावर घणाघात

हवाई जहाजातून उडी घेतल्यानंतर त्यांनी 'राम कृष्ण हरी' तसेच श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचा ध्वज आकाशात अभिमानाने फडकावत जगभरातील विठ्ठल भक्तांना प्रेरणादायी संदेश दिला.

या साहसी मोहिमेसाठी अजित कारभारी यांना रशियन मिलिटरीचे मुख्य प्रशिक्षक कोस्त्या क्रीवोत्सिव यांचे विशेष प्रशिक्षण लाभले.

Skydiving
Water Pipeline Burst: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलाजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

या उपक्रमामागे केवळ साहस नव्हते, तर समाजाला भक्तीचा आणि सकारात्मकतेचा संदेश देण्याचा व्यापक उद्देश होता. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला जागतिक व्यासपीठावर पोहोचविण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news