Anti-Maratha rally : भाईंदरमध्ये 8 जुलैला अमराठ्यांविरोधात मोर्चा

मनसेसह उबाठा, मराठी एकीकरण समिती, काँग्रेस, राष्ट्रवादीचा मोर्चात सहभाग
Anti-Maratha rally
file photo
Published on
Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी व काहीजण जातीय द्वेष व मराठी जनतेविषयी विरोध वाढविण्यासह काही मराठी द्वेष्टे शहरातील भाषिक तेढ निर्माण करीत असल्याने त्यांची चौकशी करण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या 8 जुलैला मीरारोड येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणाहून आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन शाळेदरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात शहरातील मराठी भाषिकांसह मनसे, उबाठा शिवसेना, मराठी एकीकरण समिती, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी राजकीय पक्ष सहभाग घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शहरामध्ये सध्या समाजात द्वेष पसरविणारे मराठी जनतेविरोधात अपप्रचार करीत आहेत. एका विशिष्ट समाजाला राजकीय स्वार्थासाठी भडकविणार्‍यांमुळे सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचा दावा मराठी भाषा समर्थकांनी केला आहे. मनसेने मीरारोड येथील बाबुलाल चौधरी नामक दुकानदाराला मराठी बोलण्यावरून सुनावल्यानंतर याविरोधात 3 जुलै रोजी 145 मिरा -भाईंदर विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी पक्षातील भाजप आ. नरेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने तसेच मिरा-भाईंदर व्यापारी संघटना अध्यक्षांच्या संगनमताने विनापरवानगी मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाच्या माध्यमातून अमराठी माणसावर अन्याय होत आहे, असा एकतर्फी व राजकीय हेतूने अपप्रचार करून संपूर्ण अमराठी समाजाला मराठी भाषिकांच्या विरोधात उभे करण्याचा संतापजनक प्रयत्न करण्यात आला. मागील कालावधीत मराठी माणसाविरुद्ध घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ मेहता यांनी कधीही निषेध मोर्चा काढला नाही.

एका मराठी महिलेला अमराठी कार्यकर्त्यांकडून मारहाण केली गेली. यावरही शब्द निघाला नाही. मात्र अमराठी दुकानदाराला मारल्याचे भांडवल ते करू लागले असून सामाज माध्यमांवर वल्गनात्मक भाष्य करीत भाषिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी

ज्या दुकानदाराला मारहाण झाली तो व्यवसाय महाराष्ट्रात करतो, पण त्याने मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अपमान केला. त्याच्या या अरेरावीवर मराठी समर्थकांनी आक्रोश व्यक्त केला असता काही समाजकंटकांनी हा अमराठी हल्ला झाल्याचे भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. मेहता यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताना ते आपण सर्व समाजाचे आहोत, आपले कार्य सर्व समाजासाठी राहील, असे शपथेवर सांगितले होते.

आता ते आपल्या समाजाची बाजू घेत जनतेत फुट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर, दोन भाषिकांमध्ये द्वेष पसरविल्याने विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्याच्या अनुषंगाने येत्या 8 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मराठी समर्थकांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news