Ambernath Water Shortage: अंबरनाथमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र; गळती व चोरीवर नियंत्रण नसल्याने नागरिक त्रस्त

आमदार किणीकरांची अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; ‘टँकर माफिया’वरही संशय
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये 4 लाख 60 हजार लोकसंख्या गृहीत धरून 84 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र गळती आणि पाणी चोरी यावर कोणताही अंकुश नसल्याने अंबरनाथकरांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे येथील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा, अशी लेखी तक्रार आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

Water Crisis
Anil Parab vs Shinde Sena: विधान परिषदेत परब यांची शिंदे गटावर जोरदार टीका; “हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा”

अंबरनाथ शहराला बॅरेज धरणातून 56, एमआयडीसीकडून 22 तर चिखलोली धरणातून 6 असे एकूण 84 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर दररोज पाणी लागते. मात्र पाणी चोरी व गळती लक्ष्यात घेता साधारण 7 एमएलडी इतक्या पाण्याची कमतरता भासत असल्याने अंबरनाथकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या समस्यांवर सद्याचे येथील पाणी पुरवठा अधिकारी कोणताही उपाय काढत नासल्याने अश्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलण्याची मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे.

Water Crisis
Konkan Railway Ticket Booking: कोकण रेल्वे गाड्या हाऊसफुल; उन्हाळी सुट्टीत तिकीटांसाठी प्रचंड गर्दी

अंबरनाथमध्ये अंदाजे 35 टक्के गळती होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात विविध भागांना दिवसातून एक ते दीड तास पाणीपुरवठा होत असून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या वडवली आणि शिवाजीनगर या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे रोजची पाण्याची दैनंदिन गरज पाहता नागरिकांना नाइलाजास्तव खिशाला झळ देत टँकरच्या पाण्यावर आपली गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे टँकर माफियांना पोसण्यासाठी शहरात कृत्रिम पाणी टंचाई घडवून आणली जात आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Water Crisis
IPL Fan Park India: आयपीएल फॅन पार्क्सचा जल्लोष महाराष्ट्रात; नागपूर-रत्नागिरीत चाहत्यांना स्टेडियमचा अनुभव

अंबरनाथ शहरात ब्रिटिश कालीन जल वाहिन्या आहेत. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. त्यामुळे खराब झालेल्या जलवाहिन्या व लिकेज काढणे कठीण आहे. जोपर्यंत अमृत टप्पा पूर्ण होत नाही. पाण्याची कमतरता भासेल. त्यातही कधी वीजपुरवठा खंडित झाला किंवा इतर तांत्रिक कारणामुळे पाणी बंद झाले तरच पाणी टंचाई निर्माण होते. तरी देखील अधिकारी बदलून परिस्थिती बदलणार असेल तर जरूर माझी बदली करा.

मिलिंद देशपांडे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news