बिस्कीट कंपनी
बिस्कीट बनवणाऱ्या मशीनचा बेल्ट गळ्याला लागून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.pudhari news network

ठाणे : बिस्कीटाने घेतला चिमुकल्याचा जीव

बिस्कीट कंपनीत तीन वर्षाच्या चिमुकल्याने गमावला जीव; खेळता खेळता मशीनमध्ये आल्याने दुर्घटना
Published on

अंबरनाथ : येथील आनंदनगर एमआयडीसीमधील एका बिस्कीट कंपनीत आईसोबत आलेल्या एका तीन वर्षीय चिमुकल्याने जीव गमावल्याची दुर्घटना घडली आहे.

Summary

मशीनच्या बेल्टवरुन जाणारे बिस्किट उचलण्यासाठी चिमुरडा इतरांच्या नकळत धावला व खेळता खेळता हा मुलगा मशीनमध्ये आल्याने ही दुर्घटना घडली आहे. आयुष चौहान (3 वर्ष) हा मुलगा आपल्या आईसोबत कंपनीमध्ये आला होता. मात्र तो खेळता खेळता मशीनमध्ये आल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची पोलीस चौकशी करीत आहेत.

आनंदनगर एमआयडीसीत असलेल्या कंपनीत काम करणारी महिला बिहार राज्यातून काही दिवसांपूर्वीच या कंपनीत कामास लागली होती. या महिलेचा तीन वर्षांचा मुलगा हा तिच्यासोबत असायचा. घरी मुलाचा सांभाळ करणारे कुणी नसल्याने ती कामावर येताना मुलालाही सोबत घेऊन येत होती. मात्र मंगळवारी (दि.3) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही महिला कंपनीत काम करत असताना तिचा मुलगा हा खेळताना बिस्कीट तयार करणार्‍या मशीनजवळ गेला आणि बेल्टमध्ये अडकला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनास आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news