Thane : दुखणं पायाचं अन् शस्त्रक्रिया केली प्रायव्हेट पार्टची

धक्कादायक ! चौदा वर्षीय मुलाच्या पायाऐवजी केली प्रायव्हेट पार्टची शस्त्रक्रिया
Shahapur Upazila Government Hospitals
शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयfile photo
Published on
Updated on

कसारा : शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 14 वर्षाच्या मुलाचे दुखणं पायाचे होते मात्र येथील डॉक्टरांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच शस्त्रक्रिया करून त्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. मुलाच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार मुलाच्या तळ पायाला जखम झाली होती.

त्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या पायाचे एक्स-रे काढण्यात आले. सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितले की, मुलाच्या पायाचे ऑपरेशन करावे लागेल. दुसर्‍या दिवशी त्याच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात मुलाचे ऑपरेशन करण्याआधी इतर दोन मुलांच्या प्रायव्हेट पार्टची शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यानंतर त्यालाही डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि त्याच्याही लघवीच्या जागेवर शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट केले व तेथे त्याच्या आईने त्याला बघितल्यानंतर तिच्या लक्षात आले की आपल्या मुलाच्या पायाचे ऑपरेशन करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र पायाचे ऑपरेशन केलेच नसून त्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केल्याचा प्रकार समोर आला. त्याला कोणत्याही प्रकारे कसलाही त्रास नसतांना त्याच्या लघवीच्या जागेचे ऑपरेशन का केले गेले म्हणत आईने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड केली. यानंतर त्याला पुन्हा ओटीरूममध्ये घेऊन गेले व जखम झालेल्या डाव्या पायाच्या तळ पायाचे ऑपरेशन केले. एकंदरीतच शहापूर उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा रूग्ण मुलाच्या अंगलट आला आहे.

डॉक्टर म्हणतात...

मुलाला दोन प्रॉब्लेम होते म्हणून त्याचे दोन्ही ऑपरेशन एकाच वेळी केले. ऑपरेशनच्यावेळी पेशंटच्या सोबत असलेले नातेवाईक बदलले असावेत, असे वैद्यकीय अधिकारी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर शिंदे यांचे म्हणणे आहे.

मुलाच्या आईचा आरडाओरडा

मुलाच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाच्या पायाला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याच्या पायाचे ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी त्याला ऑपरेशनसाठी घेऊन गेले व ऑपरेशन करून आणून खाटेवर झोपवले. त्यानंतर माझ्या लक्षात आले की त्याच्या तळ पायाचे ऑपरेशनच केले नाही. भलत्याच ठिकाणचे ऑपरेशन केले आहे. मी दवाखान्यात आरडाओरड केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन थियेटरमध्ये नेले व त्याच्या पायाचे ऑपरेशन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news