Thane | जांभळीनाकातील ८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

जांभळीनाका बाजारपेठेतील इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली
Jamblinaka area
जांभळीनाका बाजारपेठेतील इमारतीचा भाग कोसळल्याने एनडीआरएफचं पथक दाखल झाले आहे. pudhari news network

ठाणे : ऑनलाइन डेस्क

ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्ष जुन्या इमारतीचा भाग रविवारी (दि.७ जुलै) रोजी अचानक कोसळला. सुदैवाने ही इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळ धोकापट्टी बांधून परिसरात सर्तकतेचा इशारा दिला आहे.

जांभळीनाका येथील कडवा गल्ली परिसरात ८० ते ९० वर्ष जुनी अतिधोकादायक दुमजली इमारत आहे. या इमारत कोणीही वास्तव्यास नव्हते. रविवारी (दि.७ जुलै) रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास इमारतीचा जीर्ण झालेला भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पथकांनी येथे धोकापट्टी बांधली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news