बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या बदमाशाला अटक

कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांची लक्षवेधी कारवाई
Thane News
A miscreant who robbed passengers by giving gungy medicine from biscuits was arrestedPudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली : रेल्वे प्रवाशाशी सलगी करून त्याला बोलण्यात गुंतविल्यानंतर संधी साधून प्रवाशाला बिस्किटमधून गुंगीचे औषध खाण्यास द्यायचे. गुंगी येऊन पडला की प्रवाशाकडील किंमती ऐवज तसेच त्याकडील रोख रक्कम, मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी (दि.15) जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. रामसुरत रामराज पाल (वय.46) असे आरोपीचे नाव असून सद्या भिवंडीत राहणारा हा मुळचा उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. भिवंडीत राहून तो कल्याण ते मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांवर थांबलेल्या प्रवाशांच्या पिशव्या, मोबाईल चोरण्याचे धंदे करत होता. या संदर्भात पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची मालिका वाढत चालली होती.

Thane News
मंत्री व्हायचंय का? थेट आमदारांना लुबाडणारा ठकबाज गजाआड

कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. उत्तरप्रदेशात जाणारा एक प्रवासी मंगळवारी (दि.16) दुपारी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर उभा होता. त्याच्याजवळ एक-दोन बॅगा होत्या. हा प्रवासी उत्तरप्रदेशात जाणाऱ्या एक्स्प्रेसची वाट पाहत थांबला होता. इतक्यात रामसुरत पाल याने त्या प्रवाशाजवळ जाऊन तू कोठे चालला आहेस ? अशी विचारणा केली. आपण उत्तरप्रदेशात चाललो आहोत, असे सांगणाऱ्या प्रवाशाला रामसुरत याने आपण देखिल उत्तरप्रदेशातील असून तेथेच जाणार असल्याचे सांगितले. रामसुरत याने प्रवाशाशी सलगी वाढून त्याच्याशी बोलणे सुरू केले. या बोलण्यात आपणास भूक लागली आहे असे बोलून आरोपी रामसुरत हा स्वत:कडील बिस्किट काढून खाऊ लागला.

प्रवाशाची नजर चुकवून रामसुरतने प्रवाशाला द्यायच्या बिस्किटला गुंगीचे औषध लावून ते त्याला खाण्यास दिले. आपला सोबती आपणास बिस्किट देत आहे म्हणून प्रवाशाने विश्वासाने ते खाल्ले. तेवढ्यात प्रवाशाला तात्काळ गुंगी येऊन त्याचे डोके जड झाले. उलटी आणि मळमळ सुरू होऊन प्रवासी बसल्या जागीच चक्कर येऊन कोसळला. या संधीचा गैरफायदा घेत रामसुरत याने त्याच्याकडील बॅग उचलून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील रेल्वे पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ रामसुरतची जागीच गठडी वळली. बॅग कुणाची असल्याची विचारणा केली असता रामसुरत चाचपचला वळली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर चौकशी करताच त्याने आपण एका प्रवाशाला बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्याची बॅग चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने स्कायवॉकवरील गुंगी येऊन पडलेल्या प्रवाशाला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी रामसुरतवर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू केली आहे.

Thane News
Fruad Case | वाईन शॉप लायसन्स ट्रान्सफरच्या बहाण्याने गंडवले

रामसुरत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार

रामसुरत पाल याने गुंगीचे औषध कोठून आणले ? त्याने आतापर्यंत अशाप्रकारे किती चोऱ्या केल्या ? याचा चौकस तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्यात देखिल रामसुरतच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. रामसुरत हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news