ठाणे : अल्पवयीन मुलांना टीएमटीच्या बसने उडवले; एक ठार, एक गंभीर

वागळे इस्टेट परिसरात बसची दुचाकीला धडक
 Accident in thane
Pudhari File Photo

ठाणे : पुण्यात अल्पवयीन मुलाचे पॉर्शे कार प्रकरण ताजे असताना आज ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांना टीएमटीच्या बसने उडवले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपघात ऋषी मोंडल (१७) यांचा मृत्यू झाला असून हर्ष लोखंडे(१८) याला गंभीर दुखापत झाली आहे. तर जखमी हर्षला हाजूरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात आज संध्याकाळी पाच वाजता दोन अल्पवयीन मित्र आपल्या दुचाकीवरून जात होते. कॅप्रिया हंस कंपनी समोर त्यांना ठाणे पालिकेच्या टी.एम.टी. (एमएच ०४ एचवाय ७१३७) बसने धडक दिल्याने अपघात झाला होता. यावेळी या दोन्ही अल्पवयीन मुलांना जबर मार लगल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे लुईस वाडी येथील राहणारे असून जखमी हर्ष लोखंडे याच्यावर हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news