

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव परिसरात असलेल्या एका भंगार मालाची साठवणूक केलेल्या गोदामास सोमवार (दि.10) रोजी दुपारी भीषण आग लागली. या आगी मध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून गोदामाजवळ उभा असलेला टेंम्पो सुद्धा आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तासात ही आग आटोक्यात आणून विझवली आहे.
भिवंडीतील सोनाळे गांव परिसरात असलेल्या या गोदामात लाकडी सामान व पुठ्ठे प्लास्टिक साहित्य साठवून करण्यात आली होती. दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानकपणे गोदामाला आग लागल्याचे नागरिकांना निदर्शनास येताच त्यांनी भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तासात पाण्याचा मारा करून या आटोक्यात आणली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही.