कल्याणमध्ये मोगलाई ! मला ‘भाई’ का बोलला नाही म्हणून सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर सपासप वार

कल्याणमध्ये मोगलाई ! मला ‘भाई’ का बोलला नाही म्हणून सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर सपासप वार

कल्याण; पुढारी वृत्तसेवा

मला भाई का बोलला नाही म्हणून एका सराईत गुन्हेगाराने भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील अशोक सम्राट चौकात घडली.

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हल्लेखोरासह त्याच्या साथीदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याच्या दोन साथीदाराला अटक केली आहे. सराईत गुन्हेगार विजय शिंदे फरार आहे.

अक्षय भालेराव आणि त्याचे काही मित्र शनिवारी रात्रीच्या सुमारास एका ढाब्यावर पार्टीसाठी गेले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून आपसातच मित्रांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी त्याच ढाब्यावर हल्लेखोर विजय शिंदे आणि रवि वाघे हे उभे होते. यांच्यासोबत वाद होऊ नये म्हणून अक्षयने वाद करणाऱ्या मित्राला बाजूला केले. त्यावेळी अक्षयने हल्लेखोर विजय शिंदेला विजय बोलून वाद नकोत असे बोलून मित्राला बाजूला केले.

काल रात्री हल्लेखोर विजय शिंदेसह त्याच्या साथीदाराने अक्षयला सम्राट अशोक चौकात अडवून मला विजय का बोलला 'भाई' बोलता येत नाही का ? असे बोलत अक्षयला मारहाण केली.

मारहाणीनंतर अक्षयने त्याचा भाऊ विशाल भालेरावला मोबाईलवर संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच काही वेळातच घटनास्थळी विशाल आला. विशालला काही कळण्याच्या आतच हल्लेखोर विजयने विशालवर धारदार शस्त्राने पोटावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news