बदलापूर ; पुढारी वृत्तसेवा पुरूषांच्या खांद्याला खांदा लावत महिलांच्या ढोल पथकांचा गजर, जोडीला भगव्या ध्वज पथाकांची साथ, शंखनाद, त्याला लहानग्यांची लेझीमची जोड, सोबत पारंपरिक पैठणी परिधान केलेला महिला वर्ग आणि विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणारे चित्ररथ असे वातावरण निर्माण झाले होते. निमित्त होते गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागताचे. लहानग्यांसोबत वृद्धांच्याही सहभागाने गुढी पाडवा आणि नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेने बदलापूरातील वातावरण अगदी मराठीमय झाले होते.
स्वागत यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि हनुमान मारूती देवस्थान आयोजित या स्वागत यात्रेचा आरंभ पश्चिमेतील दत्तचौक परिसरातून झाला. हेंद्रेपाडा, मांजर्ली, कात्रप आणि शिरगांवमधून आलेल्या उपयात्रा मुख्य यात्रेत सहभागी झाल्या. गांधी चौकात झालेल्या शोभायात्रेच्या सांगतेवेळी बदलापूरकरांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या स्वागत यात्रेत बदलापुरातील विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी चित्ररथही साकारले होते. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आले.
हेही वाचा :