धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची मला कोणतीही ऑफर नव्हती : माजी खासदार संजीव नाईक यांचा खुलासा

धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची मला कोणतीही ऑफर नव्हती : माजी खासदार संजीव नाईक यांचा खुलासा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे लोकसभेसाठी धन्युष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकाराची ऑफर आल्याला नव्हती असा खुलासा माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी केला आहे. नाईक यांच्या या खुलाशामुळे ते धन्युष्यबाण या चिन्हावर लढणार असल्याची शक्यता आता धूसर झाली आहे. दुसरीकडे ठाण्यात नाईक कि सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची गरज नाही असे वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचालवल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स अद्याप कायम असल्याने या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाही. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजप कडून संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. नाईक यांच्या या 'ठाणे'वारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिले आहेत. नाईक यांनी ठाणे लोकसभा धन्युष्यबाण या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र अशाप्रकारची कोणतीही ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा संजीव नाईक यांनी केले आहे.

उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. आमची महायुती आहे. मला विश्वास आहे की येथील खासदार हा पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचे यावेळी नाईक म्हणाले. जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची गरज नाही असे वक्तव्यही यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ काढावा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ठाण्यात नाईक की सरनाईक या प्रश्नावरही त्यांनी वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता आम्हाला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे.सध्या तो वाढवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष प्रयत्नशील असल्याचे नाईक म्हणाले. ठाणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार . मात्र तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत. कार्यकर्ते देखील समजूतदार असून एकजुटीने महायुतीमध्ये काम करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

राजन विचारे यांनी उमेदवार नसेल तर बी विरोध निवडून द्या असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना नाईक यांनी आत्ता ते उमेदवार आहेत त्यामुळे काही बोलणे योग्य नाही. मात्र योग्यवेळ येईल तेव्हा उत्तर देण्यात येईल.

'या' विषयांवर ठाणे महापालिका आयुक्तांशी चर्चा

नवीन आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो असे नाईक यांनी सांगितले. आचारसंहितेमुळे नागरिकांना त्रास होऊ नये. वाहतूक कोंडीचे नियोजन करू अशी माहिती आयुक्तांनी दिली. नवीन आयुक्त चांगलं काम करतील असा विश्वास त्यांनी त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वतःच धरण असावे यासाठी नेहमीच चर्चा झाली आहे. नवीन आयुक्तही या विषयावर गंभीर आहेत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला असल्याचे नाईक यांनी सांगितले. मेट्रोचे तीन फेस मध्ये काम सुरु असून पाहिला फेज सुरू झाला आहे. तर वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने चांगले बजेट देऊन रस्त्याची कामे मार्गी लावावी अशी सरकारकडे मी विनंती असल्याचे संजीव नाईक यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news