भिवंडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ६९ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजे पर्यंत ५९.५६ मतदान झाले होते. दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मुरबाड तालुक्यातील १९ ग्राम पंचायती मध्ये सुमारे ८६ टक्के मतदान झाले. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ७६.७१ टक्के मतदान झाले होते. दहा ग्राम पंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. शहापूर तालुक्यातील १६ ग्राम पंचायती मध्ये सुमारे ७० टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६०.८५ टक्के मतदान झाले होते. एकूण जिल्ह्यात सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम आकडेवारी येई पर्यंत टक्केवारीत कमी जास्त प्रमाण होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.