ठाणे : कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली; नाशिकसह मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत | पुढारी

ठाणे : कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली; नाशिकसह मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

कसारा; पुढारी वृत्तसेवा : मुबंई ते नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकापासून 600 मीटर अंतरावर नाशिककडे जाणारी मालगाडी घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे दोन डबे पलटी झाल्याची माहिती आहे. यामुळे प्लॅटफॉर्म नंबर एक वरून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मुबंई ते नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा स्थानकाजवळ इगतपुरीच्या दिशेने आज (दि. 10) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एक मालगाडी निघालेली होती. दरम्यान या मालगाडीचे इंजिनपासूनचे 5 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले. या 5 डब्यांपैकी मालगाडीचे 2 डब्बे कपलिंग तोडून पलटी होऊन दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर पडले. परिणमी या मार्गावरील दोन्ही मार्गिकेवरील नाशिककडून-मुंबई व मुंबईकडून नाशिकला जाणारी वाहतूल विस्कळीत झाली. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व आपघात नियंत्रण पथक, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Back to top button