ठाणे : मुख्यमंत्री, खासदारांसाठी ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल…. | पुढारी

ठाणे : मुख्यमंत्री, खासदारांसाठी ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल....

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खा.श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान ठाण्यात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठण्यातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. या ठिकाणी करण्यात आलेला वाहतूक बदल हा त्याचाच भाग मानला जात आहे.हे वाहतूक बदल 7 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलिसानी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा शुभदिप बंगला, हा लॅण्डमार्क सोसायटी, लुईसवाडी, वागळे इस्टेट, या ठिकाणी आहे. या ठिकाणी मुखहमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबियाची ये-जा असल्याने या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून खबरदारी म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित यासाठी हे बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

हे वाहतूक बदल पोलीस वाहने, रूग्णवाहिका, फायर ब्रिगेड व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

असे आहेत वाहतूक बदल…

प्रवेश बंद – १) नितिन बाक्स समोन सर्विस रोडने मार्क सोसायटी, कवाडी कडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रथा स्नॅक्स येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
सदरची वाहने नितिन विजखालून कामगार नाका कडे जाणाऱ्या रोडने सरळ जावून पुढे अपोलो फार्मेसी मेडिकल, रामचंद्रनगर, जिजामाता नगर येथून दाने वळण घेवून इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद २) कावादी कट येथून सर्व्हिस रोडने प्रजा स्नॅक्स कडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना काजुवाडी कट
लॅण्डमार्क सोसायटी कॉर्नर येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
सदरची वाहने काजुवाडी वर येवून उजवे वळण घेवून हायवे स्लीप रोडने पुढे इति स्थळी जातील.

Back to top button