ठाणे : बावनकुळेंच्या सभेत मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे; गो बॅकच्या घोषणाबाजीने निषेध व्यक्त

ठाणे : बावनकुळेंच्या सभेत मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे; गो बॅकच्या घोषणाबाजीने निषेध व्यक्त

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविजय २०२४ संकल्प दौऱ्यादरम्यान कल्याण लोकमान्य टिळक चौकामध्ये आयोजित संपर्क से समर्थन अभियानाच्या समारोपाच्या चौक सभेचे आयोजन केले होते. चौक सभा सुरू असतानाच अचानकपणे कल्याणातील सकल मराठा समाजाच्या काही तरुणांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे बावनकुळे गो बॅक अशा घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध केला. यावेळी तणावाचा वातावरण पाहतात पोलिसांनी मध्यस्थी करत लगेचच आंदोलनकर्त्या सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने वातावरण तप्त झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news