

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री यांच्या निवस्थानाबाहेर साखळी उपोषण करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. शुक्रवारी (दि. २७) संध्याकाळी मुखयमंत्र्यांच्या निवस्थानाबाहेरच सकल मराठा समाजच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रकरणी पोलिसांनी 149 ची देखील नोटीस सकल मराठा समाजाला देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी साखळी उपोषण करण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारने 42 दिवस उलटले तरी आरक्षण दिले नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्याचा घेतला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवस्थानाबाहेर मराठ्यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र या ठिकाणी परवानगी नाकारून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे उपोषण करण्याची परवानगी पोलिसांनी दिल्याने मराठा समाजच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.